जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
प्रतिनिधी:-(मिलिंद पाटील.)
व्हनाळी ता.कागल येथे आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य मयत झाल्यास त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करून त्या व्यक्तीची रक्षा नदी किंवा ओढ्यामध्ये न सोडता लावलेल्या वृक्षांना टाकण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
व्हनाळी येथील बॉक्सिंग खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर सहा वेळा सुवर्णपदक पटकावत आणि सहा वेळा राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावत आपल्या गावचे नाव उज्वल केलेला खेळाडू कै.कु.ओजस उर्फ तन्मय सचिन कळंत्रे याचे दि.31/05/2025 रोजी पुणे येथे दुचाकीवरून पडून अपघाती निधन झाले.व्हनाळी येथील वृक्षमित्र व त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्या वयाइतकीच म्हणजेच 20 वृक्षांचे गावातील मराठी शाळेच्या पटांगणामध्ये व स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून ओजस ची रक्षा सर्व झाडांना टाकली.
यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी चुलते राजेंद्र कळंत्रे,मामा उपसरपंच ओंकार कौदाडे,ओजसचे प्रशिक्षक प्रशांत मोटे,वृक्षमित्र सुभाष पाटील,संदीप कौंदाडे,प्रभाकर पाटील,साईनाथ कळंत्रे,दत्तात्रय कळंत्रे,राजेंद्र जांभळे,अक्षय चौगुले,नेताजी कळंत्रे,दत्ता दंडवते,कुंभार सर,प्रकाश कुळवमोडे,महेश कौंदाडे,आकाश रांगोळे,उत्कर्ष एकल,संजय वाडकर,प्रणव कदम,प्रदिप जाधव,राहुल कुळवमोडे,सुनील जाधव,विकास चौगुले,अनिकेत कुळवमोडे,निवास कांबळे,रवींद्र जाधव,जगदीश वाडकर,डॉ.उत्तम जाधव,पांडुरंग पाटील आदि उपस्थित होते.