National Space Day च्या निमित्ताने भारताच्या स्पेस क्षेत्रातील प्रगतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या स्पेस यशांविषयी अभिमान व्यक्त करत “भारत आता केवळ स्पेस रेसमध्ये नाही, तर नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे” असं ठाम मत व्यक्त केलं.
अंतराळात भारताचा मान – Group Captain Shubhanshu Shukla.
Group Captain Shubhanshu Shukla यांचा International Space Station (ISS) वरील प्रवास हा भारताच्या अंतराळ विज्ञानाच्या क्षमतेचा एक मोठा टप्पा आहे. भारताच्या सैनिकी आणि वैज्ञानिक धोरणात ही एक ऐतिहासिक भर घालणारी कामगिरी ठरली आहे.
200 हून अधिक स्पेस स्टार्टअप्स – नवी पिढीचे अंतराळ युग:
भारताचे अंतराळ स्वप्न आता सरकारी यंत्रणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. देशात Pixxel, AgniKul Cosmos, Bellatrix Aerospace यांसारख्या 200+ स्पेस स्टार्टअप्स उदयाला आलेल्या आहेत, ज्या पृथ्वी निरीक्षण (Earth Observation), लाँच वाहन विकास, आणि इंधन प्रणाली यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.
₹500 कोटींचा "Technology Adoption Fund"
भारत सरकारने नव्याने सुरू केलेल्या ₹500 कोटी ‘Technology Adoption Fund’ च्या माध्यमातून स्पेस स्टार्टअप्सना वित्तीय सहाय्य, संशोधन अनुदान, आणि तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाणार आहे. यामुळे स्टार्टअप्स ना जगभरातील स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी बळ मिळणार आहे.
World Economic Forum चा सन्मान:
World Economic Forum (WEF) ने १० भारतीय DeepTech स्टार्टअप्सना जागतिक यादीत स्थान दिलं आहे. यामुळे भारताचा स्पेस टेक क्षेत्रातील सशक्त सहभाग आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक दृढ झाला आहे.
भारताची पुढील स्पेस मोहीम: भविष्यातील दिशा:
- Gaganyaan – भारताचा मानवी अंतरिक्ष कार्यक्रम
- Chandrayaan-4 आणि Aditya L-2 मिशन
- खाजगी क्षेत्रातून स्पेस लॉंच सर्व्हिसेस
या सर्व गोष्टी भारताला एक "Space Superpower" बनवण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
आज भारत केवळ “मिशन मून” किंवा “मिशन मार्स” पुरता मर्यादित नाही, तर स्पेस स्टार्टअप्स, तांत्रिक सक्षमता आणि जागतिक सहयोग यांच्या जोरावर तो जागतिक अंतराळ नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे.
भारताचं स्पेस युग आता सुरू झालं आहे – आणि ते थांबणार नाही!