कोल्हापूर दि 20 (प्रतिनिधी ) गेल्या चार - पाच दिवसांपासून जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे . आज काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला. तथापि पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याचे दिसून आले . दुपारी 3 वाजता दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40.8 फूट इतकी आहे . जिल्हयात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते अजूनही बंद आहेत तर काही ठिकाणी नद्या,ओढे आणि नाले यांच्या पात्राबाहेर पाणी आले आहे .
सध्या जिल्ह्यात एकूण 79 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत . पंचगंगा नदीची 43 फूट इतकी धोक्याची पातळी आहे . पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . जिल्हा व लगतच्या जिल्हयामधून मोठ्या प्रमाणावर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा या प्रमुख नदीसह जिल्हयातून वाहणाऱ्या इतर नदयांमध्ये विसर्ग चालू असून या विविध धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे
राधानगरी - 5784 क्युसेक
दूधगंगा - 25000 क्युसेक
वारणा - 34257 क्युसेक
कोयना - 95300 क्युसेक
अलमट्टी - 250000 क्युसेक
हिप्परगी - 82800 क्युसेक
पंचगंगेने इशारा पाणी पातळी ओलांडली असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .


