महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell) ने NEET UG २०२५ साठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ PwBD (Persons with Benchmark Disabilities) उमेदवारांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
महत्वाची माहिती:
- मूळ शेवटची तारीख: ३१ जुलै २०२५
- नवीन अंतिम तारीख: ४ ऑगस्ट २०२५
- अर्ज पोर्टल: mahacet.org
- अर्ज प्रक्रिया: पूर्णपणे ऑनलाइन
- NEET UG २०२५ ही परीक्षा MBBS, BDS, BAMS, BHMS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य आहे.
ही मुदतवाढ का?
राज्य CET सेलने स्पष्ट केले की, PwBD उमेदवारांचे प्रमाणपत्र सबमिशन प्रक्रियेमध्ये अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समिती (MCC) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया (सोप्या पद्धतीने):
- mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या
- ‘NEET UG 2025’ विभागावर क्लिक करा
- नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा
- आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा
- कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरून अर्ज सबमिट करा
विद्यार्थ्यांसाठी सूचना:
- अर्ज करताना सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी तयार ठेवा
- अर्जाची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा
- कोट्या/श्रेणीसंबंधी योग्य माहिती द्या
- शंका असल्यास mahacet हेल्पलाइनवर संपर्क साधा
NEET UG २०२५ च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ही मुदतवाढ म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी सुनहरा संधी आहे. अजूनही अर्ज न केलेल्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, ही विनंती.
अर्ज लिंक: https://www.mahacet.org