ही समिती आरक्षण, शिक्षण, रोजगार व इतर सामाजिक योजनांशी संबंधित अडचणींवर लक्ष केंद्रीत करणार असून, OBC समाजातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासा – प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ:
सरकारच्या या निर्णयामुळे SEBC आणि OBC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी आता अतिरिक्त सहा महिने दिले जाणार आहेत. या मुदतवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित राहणार आहे.
समितीची मुख्य उद्दिष्टे:
- OBC आरक्षणाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक
- शैक्षणिक व सामाजिक योजनांमध्ये गती
- रोजगाराच्या संधींमध्ये समावेशकता
- समाजातील मागास घटकांपर्यंत सरकारी सुविधा पोहोचवणे.

