जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या गुंठेवारी पद्धतीने घेतलेल्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचे, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचे, शिवसेना अंतर्गत गुंठेवारी समितीचे काम लोकहिताचे आहे असे प्रतिपादन मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आज गुंठेवारी समितीच्या बैठकीत मुंबई येथे केले व सदरहू लोकहिताच्या कामासाठी, शिवसेना पक्ष पूर्णपणे ताकद देणार असल्याचे पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले. राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात गुंठेवारी नागरिक राहत असून, यापूर्वी शिबिराचे आयोजन करून, गुंठेवारी कायदा २०२० पर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कायद्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही पार पाडत आहोत .सांगलीस चंदन दादा चव्हाण यांनी स्वखर्चातून *शिवसेना गुंठेवारी भवन*, *कुपवाड* येथे बांधण्याचा संकल्प करून ,त्याचा पायाभरणी समारंभ येणाऱ्या सांगली दौऱ्यात सन्माननीय पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्याचे नियोजन केले असून, त्यास शिवसेना पक्षप्रमुखांनी संमती दिली आहे त्याबरोबरच गुंठेवारी धारकांचा एक भव्य मेळावाही घेण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षीचा दसरा झाल्यावर आठ दिवसात ,राज्यातील सर्व शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांची बैठक, मातोश्रीवर घेण्यात येणार असून आज पर्यंतच्या झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यापुढे लवकरच पुण्यातील शिवसेना भावनांमध्ये ,जिल्हा अध्यक्षांची बैठक पक्षाच्या उपनेत्या मा. सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे ,उपनेत्या सुषमाताई अंधारे ,संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील सर यांच्या उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष चंदन दादा चव्हाण यांनी अनेक लोक हिताचे मुद्दे मांडले. या बैठकीस रविराज कुकडे सागर डुबल सरकार अमित पाटील विजय वांगसे प्रदीप जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.