जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या व नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी, महाराष्ट्र शासन सदैव प्रयत्नशील असून, नीती आयोगाच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातही राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आपल्या देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांमध्ये, महाराष्ट्र राज्याचा भाग महत्वपूर्ण असून, जवळपास वाटा एक ट्रिलियन असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनास कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार ,पर्यावरण आदी विविध क्षेत्रांमधील धोरणांमध्ये व योजनांमध्ये बदल आवश्यक असून, देशाच्या नीती आयोगाच्या धर्तीवर एखादी राज्यस्तरीय संस्था स्थापन केली तर महाराष्ट्र शासनाची सर्व उद्दिष्ट पूर्ण होतील असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले .महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, नीती आयोगाने राज्याला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्यासह आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर व मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. महाराष्ट्र शासनाकडून राज्यात, सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता व जलदता आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कृषी ,आरोग्य ,शिक्षण, रोजगार निर्मिती, पर्यावरण आदी मूलभूत सेवांच्यावर लक्ष देऊन, अधिकाधिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी , राज्यातही नीती आयोगाच्या धरतीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन केली तर महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल असे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले. देशाच्या निती आयोगामार्फत राज्याला सर्वांगीण विकासासाठी, कशा व कोणत्या प्रकारे सहकार्य करण्यात येणार आहे याविषयीचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले .देशाच्या नीती आयोगाच्या अनुभवाचा राज्याला अधिकाधिक फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान नीती आयोगाच्या धरतीवर राज्यस्तरीय संस्था राज्यात स्थापन करण्यासाठी, वित्त विभागाने पूर्ण तयारी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे पण आपण हे काम सन २०२७ पर्यंत पूर्ण करू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.