कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूरतर्फे "परिपूर्ण आरोग्य" या विषयावर माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर व्याख्यान
कोल्हापूर जनप्रतिसाद न्युज
: (विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
सध्या स्पर्धेचे युग असून धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव वाढला आहे. अतिरिक्त विचार केल्याने मनावर ताण निर्माण होतो. याचा परिणाम शरीरावर होऊन आरोग्य बिघडते. आनंदी जीवन व आरोग्याचा समतोल राखण्यासाठी मानसिकसह शारीरिक स्वास्थ्यही राखणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन फॅमिली फिजिशियन डॉ. संदीप पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूरतर्फे दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रविवारी (दि. 11 सप्टेंबर 2022) सकाळी संस्थेच्या सर्व 'ब' वर्ग सभासदांकरीता "परिपूर्ण आरोग्य" या विषयावर माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून फॅमिली फिजिशियन डॉ. संदीप पाटील बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालय,कोल्हापूरचे
प्रमुख न्यायाधीश डॉ.पी.के.अग्निहोत्री, अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायालय,कोल्हापूरच्या सेवानिवृत्त प्रबंधक सौ.वनिता गुणे, जिल्हा न्यायालय,कोल्हापूरचे प्रबंधक
संभाजी पाटील, पतसंस्थेचे सभापती सतिश देसाई, उपसभापती निलेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते व फॅमिली फिजिशियन डॉ.संदीप पाटील म्हणाले, अतिरिक्त विचारामुळे मनावर ताण निर्माण होतो. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते यासाठी कौटुंबिक सदस्यांमध्ये योग्य संवाद व्हायला पाहिजे. आनंद ही आंतरिक अवस्था असून आरोग्याविषयी चांगले संस्कार केले पाहिजेत. यासाठी मानसिकसह शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ठोकताळे लक्षात ठेवणे आवश्यक असून लक्षणे ओळखून काळजी घेत, लक्ष ठेवून ज्या-त्या वेळी तपासण्या करून घेणे व त्यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संचालक महेश पाटील, राजेश पाटील, विवेक तांबे, दिपक भोसले, संतोष जाधव, राजीव माने, मोहन रणदिवे, अपर्णा कागले, राजश्री सावंत आदींसह न्यायालयीन सेवानिवृत्तव 'अ' व
'ब' वर्ग सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिला काशीद यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूरतर्फे दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रविवारी आयोजित "परिपूर्ण आरोग्य" या विषयावर माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना प्रमुख वक्ते व फॅमिली फिजिशियन डॉ. संदीप पाटील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालय,कोल्हापूरचे प्रमुख न्यायाधीश डॉ.पी.के.अग्निहोत्री, अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायालय,कोल्हापूरच्या सेवानिवृत्त प्रबंधक सौ.वनिता गुणे, जिल्हा न्यायालय,कोल्हापूरचे प्रबंधक संभाजी पाटील, पतसंस्थेचे सभापती सतिश देसाई, उपसभापती निलेश कांबळे आदी उपस्थित. तसेच दुसऱ्या छायाचित्रात समोर उपस्थित कर्मचारी सभासद जनसमुदाय.
This news is co-provided by Janpratisadnews