जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
उद्योगरत्न मा.आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त होत असलेल्या मासिक उपक्रमांपैकी ,जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा (सातवे पुष्प ) हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला .
या कार्यक्रमात "65 वर्षावरील जेष्ठ नागरिक यांचे निरोगी आरोग्य व आनंदी जीवन " याविषयी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन समितीचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य बापूसो जाधव यांनी केले. यावेळी जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी संस्थेतर्फे एक सन्मानपत्र देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रसिध्द ह्रदयरोगतज्ञ डॉ.सचिन गावडे यांचे साठीनंतर घ्यावयाची विशेष काळजी याविषयी तर मुख्याध्यापक श्री.कुंदन जमदाडे सर यांचे साठीनंतरचे आनंदी जीवन याविषयी तर सौ.जया जोशी यांचे हास्याचे प्रकार व त्याचे फायदे याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. याच कार्यक्रमाचे संयोजन नियोजन समितीने केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या वेळी संस्थेच्या संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम, गुरुपरिवाराचे प्रवक्ते धन्यकुमार शेट्टी, डाॅ.जे व्ही शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती .याच वेळी संस्थेचे संचालक ,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक -शिक्षिका पालक व जेष्ठ नागरीक ,नगरातील प्रतिष्ठित ग्रामस्त व विद्यार्थी उपस्थित होते.