जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याबाहेर गेलेल्या वेदांत फॉक्स कॉन प्रकल्पानंतर, बल्क ड्रग पार्क प्रकल्प ही राज्याबाहेर गेला आहे असा आरोप शिंदे फडणवीस सरकारवर माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. कालच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्स्वान प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर माध्यमांसमोर फार टीका केली होती .आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेल्याचा नवा आरोप केला आहे. केंद्र सरकारने गुजरात ,आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ला बल्क ड्रग पार्कबाबत रिपोर्ट मागवला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सदरहू प्रकल्प बाबतीत पत्र लिहिले होते .सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणून ,बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये येण्याचे नियोजन केले होते. वास्तविक पाहता महाराष्ट्राने बल्क ड्रग पार्कची मागणी प्रथम केली होती. आता हा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरात राज्यामधील भरूच मध्ये होणार असल्याचे समजते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहीत नसेल की महाराष्ट्राचा बल्क ड्रग पार्क प्रकल्पावर पहिला हक्क महाराष्ट्राचा होता .तो आता आपल्या हातातून निघून गेल्यासारखे आहे अशी टीका शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.