जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
रशियातील मॉस्को येथे ,आज दिनांक १४/०९/२०२२ रोजी, दुपारी २.०० वाजता साहित्य भूषण, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
साहित्य भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ,रशियातील मॉस्को मध्ये उभारणे ही समस्त भारतीयांसाठी व महाराष्ट्रातील नागरिकांच्या साठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे. आज सांगलीमध्ये मारुती चौकात या घटनेच्या आनंदोत्सवा प्रित्यर्थ दुपारी ५.०० वाजता साखर वाटून साजरा करून ,एकच जल्लोष करण्यात आला .या सांगलीतील मारुती चौकातील,आनंदोत्सव सोहळ्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव पृथ्वीराज पवार उपस्थित होते. साहित्यभूषण ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान व्यक्तीचे ,रशियातील माॉस्कोमध्ये पुतळा उभारणे म्हणजे समस्त भारतीयांच्या दृष्टीने फार मोठ्या अभिमानाची ,त्यांच्या कार्याच्या प्रेरणेची व आनंदाची गोष्ट आहे.