जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एस.टी. कामगार संघटनेने, एस.टी. कामगारांच्या प्रलंबित असलेल्या एकूण३४ मागण्यासाठी २२ ऑगस्ट ला उपोषणाची नोटीस देऊन, १७ सप्टेंबर पासून लाक्षणिक उपोषणाची हाक कामगार संघटनेने दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची २०२० पासून थकीत देणी तातडीने देणे, मेक्सिकॅबला प्रवासी परवानगी देण्यात येऊ नये, एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, खात्यामार्फत बढती परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करावी, २०२० पासून थकीत वैद्यकीय भत्ता तातडीने कर्मचाऱ्यांना द्यावा या व इतर एकूण ३४ मागण्यांच्या साठी लाक्षणिक उपोषणाची हाक एस.टी.
कामगार संघटनेने दिली आहे. एस.टी. महामंडळाच्या कामगार विभागातील महाव्यवस्थापकांनी, एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी, आज गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता चर्चेचे आयोजन केले आहे .सदरहू बैठकीत उपोषणाच्या नोटीस वर चर्चा करण्यात येऊन योग्य तो मार्ग काढण्याबाबत चर्चा होईल.