*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सरकारचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी क्रमांक- एम व्ही आर -०९२१/ संकीर्ण७७/ का- २/ जा. क्र. १०२०१ , परिपत्रक क्रमांक ४३/ २०२२ ने दि. 17 सप्टेंबर २०२२ रोजी **चालक दिन* म्हणून घोषित केला आहे. देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील *वाहन चालक* हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून ,त्यांची अनन्यसाधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये या संपूर्ण महत्त्वपूर्ण योगदान बाबत वाहन चालकांचा उचित सन्मान करण्याच्या दृष्टीने, दि. १७ सप्टेंबर २०२२ हा दिवस *_चालक दिन_** म्हणून घोषित करण्यात आला आहे. दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहनचालकाचा सन्मान करणे ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असून, महाराष्ट्र सरकारने याबाबतीत अत्यंत उचित पाऊल उचलले आहे. दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाच्या सर्व कार्यालयात, तपासणी नाक्यावर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी, स्थानिक स्वयंसेवी संस्था( एन.जी.ओ) यांच्या सहकार्याने व मदतीने वाहन चालकांना पुष्प व शुभेच्छा देऊन उचित सन्मान करावा असे परिपत्रकात म्हटले आहे .सदरहू दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी साजरा होणाऱ्या *चालक दिना* च्या परिपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच सर्व नियंत्रक अधिकारी, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना कळवण्यात आले आहे.