जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी )
सध्या बाजार पेठेत सोने खरेदीला चांगले दिवस आले आहेत. तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल, तर सध्या आलेली संधी ही चांगली आहे. गेल्या चार महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक असा नीचांकी दर, आजच्या सोने घसरणीत परिवर्तनीय झाला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व बँकेकडून होत असलेल्या सातत्याने व्याजदरातील वाढीमुळे, सोने दर आणखी खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील सराफ बाजारपेठे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण ही सुरूच आहे. यंदाच्या वर्षातील सणांचा हंगाम चालू होत असल्याने, सराफ बाजारातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जर सोने आपणास खरेदी करायचे असेल तर ही एक चालून आलेली सर्वोत्तम संधी आहे. आजच्या सोन्याच्या बाजारपेठेतील घसरणीनंतर, सोन्याने चार महिन्यातील दरामध्ये, सर्वात जास्त नीचांक दर गाठला आहे. सध्या सोन्याचा दर सराफ बाजारपेठेत अंदाजे रुपये ५०,०००/- प्रति तोळा इतका दर झाला आहे. त्यात आणखीन भरीतभर म्हणजे पुढील आठवड्यात होणाऱ्या, फेडरल रिझर्व बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने, सोन्याच्या दरात आणखी बऱ्याच अंशी घट होण्याची अपेक्षा आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचादर ४९,७९०/- रुपये प्रति तोळा इतका होता तर चांदीचा दर ५६८८५/- रुपये प्रति किलो इतका होता.