*सांगलीमध्ये पद्मभूषण स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या जयंती निमित्य, समाधीस्थळासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी आदरांजली--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सांगलीत पद्मभूषण स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील यांची जयंती वसंतदादा समाधीस्थळासह वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली आधी विविध ठिकाणी य आदरांजली वाहून, सर्व धर्मीय प्रार्थना सभा झाली.
प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा, मा. श्रीमती शैलजाभाभी पाटील, यांचे हस्ते स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करणेत आले. व बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व उपस्थितांचे वतीने माजी नगरसेवक अय्याज नाइकवडी यांनी मनोगतपर अभिवादन केले.
यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेविका शुभांगी साळुंखे, वहिदा नाईकवाडी,माजी महापौर किशोर शहा, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार पी.एल.रजपूत सर, वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व्हा.चेअरमन सुनील आवटी, संचालक अमित पाटील,एम.डी. संजय पाटील, वसंतदादा दुध संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे जीवन पाटील, शंकरबापू पाटील,अरविंद पाटील, विष्णुअण्णा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संग्रामदादा पाटील, आदिनाथ मगदूम, रघुनाथबापू पाटील, आण्णासाहेब उपाध्ये, माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी, दिलीप पाटील, प्रा.डॉ.घेवडेसर, रजिस्टार किरण पाटील, धनाजी पाटील कोकळे, रावसाहेब शिंदे वाघोली, शशिकांत नागे, उत्तमराव पवार कुंडल, राजेश एडके, बाहुबली कबाडगे, महावीर कागवाडे, चंदनदादा चव्हाण, श्रीप्रसाद चोपडे,श्रीपाल चौगुले, इरफान मुल्ला, दत्तात्रय नलवडे, विलास गावंड, सुरेश निकम, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्रप्रसाद जगदाळे, पंडित पवार,राहुल थोटे, भिमराव चौगुले, सुरेश गायकवाड,शिवराज पाटील,शशिकांत पवार, लालसाब तांबोळी, श्रीमंत पांढरे, सचिन घेवारे, संग्रामसिंह गळवे, श्रीधर बारटक्के, सुभाष पट्टणशेट्टी,मुफीत कोळेकर,डॉ.उस्मान मुजावर, नितीन दुबे, सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव येथे पी.एल.रजपूत सर, आदिनाथ मगदूम, प्रा. डॉ. घेवडे सर, प्रा. बाजीराव पाटील, रजिस्टार किरण पाटील, बी.एस.पाटील आणि कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी कॉलेज येथे आदरांजली वाहिली. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व्हा.चेअरमन सुनिल आवटी, एम.डी. संजय पाटील, ऍडव्होकेट व्ही.एम. कुंभार, विलास गावंड, कर्मचारी वृंद यांनी आदरांजली वाहिली.
त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथेही वसंतदादा दुध संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील, तुळशीराम शिंदे,जिल्हा कॉंग्रेस सेवादलचे श्रीधर बारटक्के, नामदेव पठाडे, सुभाष पट्टणशेट्टी, विठ्ठलराव काळे, हनुमान साबळे, लालसाब तांबोळी, श्रीमंत पांढरे,विश्वासराव यादव, विलास बेले,मुफीत कोळेकर, प्रथमेश शेटे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल शेट्टी,दिव्यांग सेलचे सुरेश गायकवाड, भिमराव चौगुले यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहिली.