*कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात, आज शनिवारी किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांनी श्री देवीच्या मुखाचे नयन मनोहर दर्शन--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीच्या मंदिरात किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांनी, श्रीदेवीचे मुखास स्पर्श होऊन, *नयन मनोहर मुख दर्शन* सोहळा, आज शनिवारी सूर्यकिरणांच्या मावळतीच्या साक्षीने संपन्न झाला. आज पासून किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांचा परतीचा प्रवास चालू झाला असून, रविवारी किरणोत्सव सोहळ्याचा अखेरचा दिवस असेल. प्रकाशोत्सवाच्या सोहळ्यातील सोनेरी किरणांची प्रखरता, यंदाचे वर्षी चांगली असल्याने, श्रीदेवीच्या चेहऱ्याचे मुखदर्शन स्पष्टपणे होत होते. यापूर्वी प्रकाशोत्सवाची सोनेरी किरणे मंदिरात पोहोचण्यासाठी, त्यांच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे सूर्यकिरणांची सोनेरी किरणे ,श्रीदेवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचून, श्रीदेवीचे उजळलेले नयन मनोहर रूप पाहण्याची, एक अवर्णनीय पर्वणी प्राप्त होत आहे. आज श्री.देवीच्या मंदिरातील महाद्वारात सूर्य किरणांनी प्रवेश करून, प्रकाशोत्सवाच्या सोनेरी किरणांनी ५:४४ मिनिटांनी, श्रीदेवीच्या चरण कमलांना स्पर्श करून, ५:४५ मिनिटांनी मूर्तीच्या गुडघ्यावर व अखेर शेवटी ५:४८ मिनिटांनी श्रीदेवीच्या चेहऱ्यावर, मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे पोहोचून , *नयन मनोहर मुखदर्शन प्रकाशोत्सव सोहळा* साजरा झाला. आज प्रकाशोत्सवाच्या मावळतीच्या सोनेरी किरणांच्या सोहळा साजरा होण्याचा अखेरचा दिवस आहे.