*सांगली- यंदाच्या वर्षीच्या वर्धा येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड घोषित.-*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
यंदाच्या वर्षीच्या, 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती व साहित्यिक *नरेंद्र चपळगावकर* यांची निवड झाली असून सदरहू संमेलन, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे संपन्न होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या( 96 व्या) अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याची घोषणा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी वर्धा येथील पत्रकार परिषदेत केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 96 वे संमेलन, विदर्भातील वर्धा या ठिकाणी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 पासून ते 5 फेब्रुवारी 2023 या तीन दिवसाच्या कालावधीत होत आहे.
विदर्भातील वर्धा या ठिकाणी स्वावलंबी शाळेच्या भव्य क्रीडांगणावर सदरहू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या( 96 व्या) स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्वीकारली असून ,या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे असणार आहेत. सदरहू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त, वर्धा येथे भरत असून या संमेलनाचे निमंत्रक संस्थापण विदर्भ साहित्य संघ आहे.