*मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर, कधीही कर्नाटक राज्यामध्ये जाण्यास तयार असल्याचे प्रतिपादन- सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
भारतीय संविधान घटनेनुसार, आपण देशात कोठेही, कधीही फिरू शकतो. त्यामुळे कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वक्तव्याला जास्त किंमत देण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये निवडणुका समीप आल्यानंतर, कन्नडवासियांची मते जिंकण्यासाठी महाराष्ट्रद्वेषी वक्तव्य समाजात करण्याची, जुनी पद्धत माजी मुख्यमंत्री गुंडूराव असल्यापासून चालत आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयानी, आपणास जर आदेश दिला तर, आपण कोणत्याही क्षणी कर्नाटक राज्यामध्ये जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील विरोधकांनी मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने मात्र एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.