*महाराष्ट्राचा सुपुत्र मराठमोळा नेमबाज रुद्राक्ष पाटील याला प्रेसिडेंट कप 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक.---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्राक्ष पाटील यांनी इजिप्तची राजधानी कैरो येथे संपन्न झालेल्या प्रेसिडेंट कप 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून, महाराष्ट्रासह भारत देशाचे नाव उज्वल केले आहे. सध्याच्या या विशेष कामगिरीमुळे जागतिक शूटर ऑफ द इयर सह, गोल्डन टारगेट चा पहिला भारतीय मानकरी रुद्राक्ष पाटील ठरला आहे. इजिप्तची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या प्रेसिडेंट कप 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत, त्याने सुवर्णपदक जिंकून 15000 डॉलरचे बक्षीस म्हणजे जवळपास 12 लाख रुपये (भारतीय चलनामध्ये) जिंकले आहेत. महाराष्ट्राचा मराठमोळा रुद्राक्ष पाटील हा गेले काही काळापासून ,10 मीटर एअर रायफल मध्ये, बऱ्याच स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करत होता. सुवर्णपदक विजेता नेमबाज रुद्राक्ष पाटील याने यासाठी कमालीचे परिश्रम घेऊन सुवर्णपदकास गवसणी घातली. या स्पर्धेपूर्वी नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, जागतिक रँकिंग नुसार पहिल्या 12 मध्ये त्याने स्थान पटकावले होते या 12 नेमबाजाचा समावेश या इजिप्त ची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये झाला होता. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनने, (आय.एस.एस.एफ ) या स्पर्धेसाठी टॉप 12 नेमबाजाना निमंत्रित करून ,सदरची स्पर्धा आयोजित केली होती .सदरहू स्पर्धेमध्ये रुद्राक्ष पाटील याने पात्रता फेरीत 630.1 गुण मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला .सेमी फायनल प्रवेशानंतर, रुद्राक्ष पाटील याने ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंच्या वर मात करून ,आपले वर्चस्व गाजवत फायनल मध्ये प्रवेश केला. अखेर शेवटी फायनल मध्ये त्याचा सामना पुन्हा एकदा इटलीचा नेमबाज डॅनिलो सोलार्जो याच्याशी झाला. सामन्याअंती रुद्राक्ष पाटील याने डॅनीलोवर 16/ 10 च्या फरकाने मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक विजेता रुद्राक्ष पाटील यांच्या परिवाराने ,त्याला खूप आधार देऊन सपोर्ट केल्याचे समोर आले आहे .रुद्राक्ष पाटील याचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी असून ,सध्या त्यांच्याकडे पालघर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आहे व आई हेमांगिनी पाटील या परिवाहन विभागात, नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर काम करत आहेत.