नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचा अभूतपूर्व विजय
नागालँडमध्ये आर पी आय चा निळा झेंडा फडकला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
आझाद मैदानात आनंदोत्सव
मुंबई दि. 2 - नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँड च्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली.
आज दि.2मार्च दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुंबई प्रदेश तर्फे नागालँड मध्ये आरपीआय चे 2 उमेदवार विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान मुंबई येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.