एस.जे.फाउंडेशन तर्फे एक आगळीवेगळी भाऊबीज.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(प्रतिनिधी :जावेद देवडी)

कोल्हापूर :एस. जे. फाउंडेशन लाईन बाजार कसबा बावडा यांनी यावर्षीची दिवाळी भाऊबीज समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या शहरातील वारांगणा यांचे सोबत साजरी केली.पद्मा पथक हॉल लाईन बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात शहरातील गरजू वारंगना यांना एक महिन्याचे राशन व एक साडी देऊन त्यांचा भाऊबीज दिवशी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून गीता हसुरकर सामाजिक कार्यकर्त्या तसेच प्रधान सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर या होत्या त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना एस जे फाउंडेशनचे कौतुक केले की त्यांनी अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविल्या तसेच वारंगणा यांना स्वतःचे तसेच समाजाचे आरोग्य बिघडणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी तसेच आरोग्य विषयी मार्गदर्शन केले वारंगना संघटनेच्या अध्यक्ष शारदा यादव यांनी उपस्थित नागरिकांना आव्हान केले की आम्ही स्वतःच्या मर्जीने या व्यवसायात पडलेलो नाही प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काही कटू प्रसंग आलेत म्हणून या व्यवसायात आम्ही ओढलो गेलो आहे एस जे फाउंडेशनने हा आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल सर्व वारंगना यांचे तर्फे एस जे फाउंडेशनचे आभार मानले. एस जे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी समाजाचे आम्ही काहीतरी देणे लागतो या विचाराने तसेच खरोखर गरजूंना मदत व्हावी जे समाजापासून दुर्लक्षित आहे अशा घटकांना मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांनी उपस्थित सर्व वारंगांना तसेच उपस्थित नागरिक यांचे आभार मानले.

कार्यक्रमास आजिज शेख,मदन तोरस्कर, राहुल भोसले,अर्जुन जाधव, गोपी शेख,शुभम जाधव,संग्राम जाधव, पिंटू दळवी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top