*महाराष्ट्र राज्यात येत्या तीन दिवसात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता--- भारतीय हवामान विभाग .*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
भारतीय हवामान खात्यामार्फत महाराष्ट्रात, येत्या तीन दिवसात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भात येत्या तीन दिवसात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 7 मार्च रोजी, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहून, दुपारच्या नंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात सकाळच्या वेळेला थंडी आणि दुपारच्या वेळी कडकडीत ऊन अशा गोष्टीला नागरिकांना सामोरे जावयास लागत असून, यामुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सर्दी- ताप -खोकले -पडसे या रोगांचा सामना करावा लागत आहे.