*भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे "होळी," त्या सणाविषयी माहिती---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात होळी हा सण साजरा केला जातो. विशेषत्वे करून भारतामध्ये ,उत्तर भारतीयांच्यात फार मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होऊन, या सणाला फार मोठे महत्त्व दिले जाते .होळी या सणाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलीकादहन अशा विविध प्रकारच्या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात होळी साजरी करून ,वाईट विचार -अनिष्ट प्रथा यांचे दहन करून ,एक विजयाचे प्रतीक म्हणून, होळी सण सामाजिक अनन्यसाधारण महत्वाने साजरा केला जातो. एकमेकांच्या आपापसात प्रेम वृद्धिंगत व्हावे व सौदाहार्याचे प्रतीक म्हणून, एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. भारतीय नागरिकांच्या मध्ये परस्पर प्रेम व आपुलकी वाढावी म्हणून या सणाचे फार मोठे महत्त्व अधोरेखित झाले आहे . हा सण भारतामध्ये दोन किंवा तीन दिवस ,विविध प्रांतांमध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये होळीच्या दिवशी, होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, वाईट विचार ,अनिष्ट प्रथा यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती देवो ही प्रार्थना केली जाते.