सांगलीत वाहतूक प्रश्नी, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखाली, लवकरच ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठी बैठक.--- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी .
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले चार-पाच दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी, आज सांगली शहराच्या वाहतूक प्रश्नी, सर्वंकष आढावा बैठक घेऊन, विविध उपायोजनांसाठी, जिल्हा प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था ,बांधकाम विभाग यांनी मिळून लवकरच एक एकत्रित ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे ठरवले असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी, आज सांगली शहरासह सांगली जिल्ह्याच्या वाहतूक प्रश्नावर आढावा बैठकीत माहिती जाणून घेतली. सांगली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याला भेट देऊन ,पोलीस खात्यांच्या विविध समस्यांचा, गुन्हेगारीचा संपूर्ण लेखाजोगा घेतला.
सध्या सांगली जिल्ह्यातील विविध महामार्गामुळे जिल्ह्याच्या व शहराच्या वाहतुकीवर मोठा ताण पडत असल्यामुळे ,शिवाय वाहनांची संख्याही वाढत असल्यामुळे, यासंदर्भात उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. भरधाव वेगाने चालवणाऱ्या वाहनचालकांची संख्या पण वाढली असून, फक्त त्यातील मृत्यूंची संख्या घटली आहे. यासंदर्भात योग्य त्या उपाययोजनांसाठी ,संबंधित वाहतूक शाखेशी सल्लामसलत करून सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान प्रत्येक पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना सदवर्तनाची वागणूक देऊन, तक्रारदारांशी सुसंवाद ठेवावा अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली आहे. सद्यस्थितीत सांगली पोलीस दलाची कामगिरी अत्यंत समाधानकारक असून, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, योग्य त्या सूचना केल्या आहेत .सांगली जिल्ह्यातील गस्तीपथके, तपास यंत्रणा विभागांचा यांचा आढावा घेऊन, योग्य त्या मार्गदर्शनात्मक सूचना केल्या आहेत.