जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( *अनिल जोशी)*
सांगलीतील तासगाव तालुका हा द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत, आज पर्यंत अग्रेसर राहिला आहे .येथूनच परदेशासाठी द्राक्षे निर्यात होत असतात, परंतु सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकरी हा, द्राक्षाच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कोंडीत सापडला आहे. सांगली जिल्ह्यातून एकीकडे द्राक्ष निर्यातीस वेगाला असून, मात्र द्राक्षाच्या दरातील आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना परवडण्याजोगा नसल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे .त्याचबरोबर द्राक्षे ही नाशवंत मालात मोडत असल्यामुळे, द्राक्ष वर्ग शेतकऱ्यांना विक्री शिवाय पर्याय नाही .सध्य परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून कमी प्रतीच्या द्राक्षांचा दर प्रति किलो 30 ते 40 रुपये मिळत असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील निर्यातक्षम असलेल्या द्राक्षाला 70 ते 80 रुपयापर्यंतचा दर प्रति किलो मिळत आहे.
द्राक्ष बागायतदार शेतकरी वर्ग, द्राक्ष दरात केव्हा वाढ होईल ?अशी आशा लावून वाट बघत बसला आहे .कोरोना महामारी नंतरच्या काळात सुद्धा शेतकऱ्याच्या पदरी एकंदर निराशजनक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. सध्याच्या काळात वातावरणातील वारंवार होणारा एकंदर बदल लक्षात घेता, द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी होत असलेला उत्पन्न खर्च अगोदरच शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेला आहे .त्यात सध्या द्राक्ष दरात होत असलेल्या मोठ्या पडझडीमुळे शेतकरी वर्गात निराशा पसरलेली आहे.