सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधील तोंडली गावात श्री अंबिका विद्या मंदिर शाळेत ,"जागतिक महिला दिन" समारंभ संपन्न---
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
(अनिल जोशी)
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ,सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधील तोंडली गावातील श्री अंबिका विद्या मंदिर शाळेत, जागतिक महिला दिन समारंभ संपन्न झाला. कोरोना महामारीच्या काळात, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी ज्या रणरागिणी, आशा वर्कर यांनी मोलाची सेवा केली, तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य जनतेच्या सेवेसाठी बजावले अशा महिला रणरागिणी अाशा वर्कर यांचे , *जागतिक महिला दिनाचे* औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 19 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात, श्री अंबिका विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रेया जनार्दन मोहिते या शिवकन्येने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल छान विचार मांडून समाजाचे प्रबोधन करून आपले वक्तृत्व सिद्ध केले, अशा कुमारी श्रेया जनार्दन मोहिते हिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील एक पुस्तक व रुपये 201 चे बक्षीस देण्यात आले. श्री अंबिका विद्यामंदिर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी आणि चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास तोंडली गावचे ज्येष्ठ नेते शंकर नाना पाटील, विद्यमान उपसरपंच रणजीत मोहिते ,अंबिका तालीम चे वस्ताद पैलवान अजय मोहिते, अंबिका अर्थमूव्हर्स चे श्री. मोहिते व प्रमोद कुंभार उपस्थित होते.