*नाशिक मधून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने, विविध मागण्यांसाठी, माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर पायी मोर्चा.--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, नाशिक ते मुंबई माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मोर्चा निघाला असून, विधानसभेवर धडकणार आहे .सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून, विधानभवनावर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ धडकणार आहे .महाराष्ट्र सरकारला काही मागण्यांचे निवेदन देऊन ,विधिमंडळाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या पायी मोर्च्याची सुरुवात झाली आहे. जुनी पेन्शन योजना, कोलमडलेली आरोग्यसेवा, शेतमजूर, शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व गोरगरीब, दलित आदिवासींच्या मागण्यासाठी विधिमंडळाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे. अाशा वर्कर, पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी, शेतकऱ्यांच्या योग्य त्या नुकसान भरपाईसाठी, विधिमंडळाचे लक्ष खेचून घेण्यासाठी, हा मोर्चा विधानसभेवर धडकणार आहे. माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाशिक मधून रविवारी निघाला असून ,तो मुंबई विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना धडकणार आहे.