*महाराष्ट्र राज्याच्या धार्मिक तीर्थस्थळांच्या विकासासाठी, भरीव निधी देण्याची घोषणा--- राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील विविध धार्मिक तीर्थस्थळांच्या विकासासाठी, भरीव निधी देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतुदीने केली आहे .संत मुक्ताई , संत निवृत्तीनाथ ,संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम यांच्या वारींच्या सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपयांची निधीची तरतूद केली असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शासन लवकरच ,संत नामदेव महाराज किर्तनकार सन्मान योजना लागू करणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे .दरम्यान मुंबई, पुणे महानगरपालिका, रायगड जिल्हात हवाई वाहतूक इंधनावरचा मूल्यावर्धित कर हा 25 टक्क्यावरून 18% पर्यंत आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे .शिवाय विविध कर भरण्यात येणाऱ्या मध्ये, शास्ती, विलंब शुल्क, थकबाकी तडजोड यासाठी असलेल्या योजनांची घोषणा सुद्धा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.