*महाराष्ट्र राज्यात कामगारांच्या कल्याणासाठी, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार --महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याचबरोबर संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ,पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महामंडळ आदी महामंडळे स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आंबे गावात, छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी ५० कोटी रुपये, किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनावर सुसज्ज संग्रहालय उभारणीसाठी ३०० कोटी रुपये, शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये, मुंबई ,अमरावती ,नाशिक ,छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर दृकसाव्या सुविधा उद्यान उभारणीसाठी २५० कोटी रुपये आदी तरतूद केली असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे .एकंदरीत महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने, कामगारांच्या कल्याणासाठी व सोयीसाठी योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.