सांगलीच्या कृष्णा नदीत प्रदूषण युक्त पाणी सोडून लाखो माशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी, वसंतदादा साखर कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीस, पुढील आदेशापर्यंत बंदी-- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले काही दिवस कृष्णा नदीच्या पात्रात लाखो मासे, विविध ठिकाणी मरून पडत आहेत, तसेच कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रदूषणाचा प्रश्न ,हा फार गंभीर बनला आहे. नुकतीच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत विविध पक्षांच्या वतीने आंदोलने झाली आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात अंकलीपुलानजीक, लाखो मासे मृत्युमुखी पडले होते त्याबाबतीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी कडक कारवाई करत, कृष्णा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या, वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीवर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत, पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्तांना देखील फौजदारी का करू नये? अशी नोटीस बजावली आहे . शेरी नाल्याचे पाणी व त्याच शेरीनाल्याच्या पाण्यात कारखानाचे डिस्ट्रिलरीचे रसायनयुक्त पाणी कृष्णा नदी पात्रात सोडले जात आहे. यासाठी महापालिकेवरही कारवाईचा बडगा महाराष्ट्र प्रदूषण मंडळांने उगारला आहे. वसंत दादा सहकारी साखर कारखान्याचे प्रदूषण युक्त पाणी, गुरुवारी रुसूलवाडी व सांबरवाडी येथून, शेरीनाल्याची पाईपलाईन फुटून ,कृष्णा नदीत मिसळण्याचे स्पष्ट झाले आहे. सदरहूबाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अौताडे साहेब यांनी अत्यंत सखोल चौकशी करून, माशांच्या मृत्यूस कृष्णा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या वसंतदादा साखर कारखान्याबाबतीत सविस्तर अहवाल, प्रादेशिक कार्यालयाला सादर केला होता .त्यानंतर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीवर पुढील आदेश पारित होईपर्यंत कारखाना चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे .त्याचप्रमाणे पाटबंधारे व महावितरण विभागाला देखील कारखान्याची लाईट आणि पाण्याचे कनेक्शन त्वरित कट करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान दत्त इंडिया कंपनीवर म्हणजेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर व महापालिकेवर केलेल्या कारवाईचे नागरिक कृती समितीचे नेते सतीश साखळकर व नागरिकांनी स्वागत केले आहे.