*महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ,कांद्याच्या बाबतीतील नुकसान भरून न येण्यासारखे असून ,त्यांना दिलासा देण्यासाठी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी, रुपये 300 प्रतिक्विंटल सानूग्रह अनुदान देण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. देशातील कांद्याची मागणी, देशातून होणारी निर्यात व सध्याचे असलेले कांदा उत्पादन या गोष्टी कांद्याचा दर घसरण्यास कारणीभूत झाल्या असून ,त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रुपये 300 प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी, विधानसभेच्या सत्रात, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कांदा उत्पादन करून, अडचणीत आलेल्या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती .राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचेसह ,अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही सरकारने कोणतीही मदत दिली नसल्याच्या निषेधार्थ सभात्याग केला होता. एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 300 प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय हा तूर्तास एक आधार म्हणावा लागेल.