*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )सांगलीतील कृष्णामाई घाटावर, आज सायंकाळी 7:00 वाजता पृथ्वीराज फाउंडेशन च्या वतीने, राम जन्मोत्सवाचे औचित्य साधून, 11111 दिव्यांचा दीपोत्सव व महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. भगवान प्रभू रामचंद्राच्या 51 फुटी भव्य आणि दिव्य प्रतिमेसमोर, महाआरती करण्यात आली. सांगलीकर रामभक्तानी प्रचंड जल्लोषात- उत्साहात, रामनवमीचा रामजन्मोत्सव साजरा केला. सांगलीतील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या कृष्णामाई तीरावर,11111 दिव्यांचा दीपोत्सव साजरा केलेने, संपूर्ण परिसरास आकर्षक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते .सांगलीकर रामभक्तांचा," जय श्रीराम" ,"जय श्रीराम" अशा घोषणांनी कृष्णामाई घाटाचा परिसर दुमदुमून गेला होता.
सांगली शहरातील सर्व तरुण रामभक्तनी आणि विशेषतः महिला रामभक्तांची उपस्थिती अवर्णनीय लक्षवेधी होती. कृष्णामाई घाट तीरावर, रामजन्मोत्सवानिमित्त विशेष बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केला गेला. या दीपोत्सव व महाआरतीच्या कार्यक्रमासाठी गेले काही दिवस, पृथ्वीराज पाटील फाउंडेशन चे कार्यकर्ते मेहनत घेत होते. कृष्णामाई घाटाचा परिसर दिव्य अशा दीपोत्सवाने उजळून निघाला होता. सांगली शहरवासीयांतील रामभक्तांचा आनंद जिकडे पहावे तिकडे ओसांडून वाहत होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या रामभक्तांचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वागत केले .या भव्य आणि दिव्य दीपोत्सव व महाआरतीच्या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार, सांगली, मिरज आणि कुपवाड महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्री पाटील, नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर, प. पू. दीपक केळकर महाराज, प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज, नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, तोफिक शिकलगार, मनोहर सारडा ,विजय घाडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.