*नवी दिल्लीतील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम इन मेडिकल सायन्सेसने, NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला.---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
नवी दिल्लीतील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसने, NEET PG 2023 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून, ऑनलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल उपलब्ध झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी दिली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम इन मेडिकल सायन्सेस च्या NEET PG 2023 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केले आहे .नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेस च्या NEET PG 2023 परीक्षेसाठी, सुमारे 2 लाख 90 हजार विद्यार्थी बसले होते. नॅशनल स्कूल ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेस च्या वतीने , एम.डी., एम. एस., डी. एन. बी. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या, 2023 -24 शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी , NEET PG 2023 परीक्षा, 5 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. NEET PG 2023 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्वत्र अभिनंदन होत आहे. लवकरच NEET PG 2023 च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल.