जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी ) सांगली जिल्ह्य़ातील नांद्रे गावात हनुमान जयंती "च्या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा आयोजित केला असून, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई बाळासाहेब पाटील यांचे दि.10 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ठीक 6:30 ते 10:00 वाजेपर्यंत सुश्राव्य कीर्तन होणार आहे तरी याचा समस्त नांद्रे व पंचक्रोशीतील बांधवांनी लाभ घ्यावा.
तसेच गुरुवार दिनांक 6 एप्रिल हनुमान जयंती दिवशी सकाळी 6:00 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होणार असून, त्यानंतर सकाळी 8:00 वाजता, हनुमानाची पालखी सेवा , समस्त ग्रामदर्शनासाठी निघणार आहे. सकाळी ठीक 11:00 वाजता पालखी परत आल्यावर , महाप्रसादाचे आयोजन केले आहे . गेली कित्येक वर्षे चालत आलेली ही परंपरा सर्व समाज बांधव एकत्र येवून जोपासत असतात, या वर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधून, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई बाळासाहेब पाटील यांचा किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम 10 एप्रिल 2023 रोजी रंगणार आहे या कीर्तन सोहळ्याचे सर्व किर्तन प्रेमी रसिकांनी याचा उत्स्फूर्तपणे लाभ घेऊन, आपला आनंद द्विगुणीत करावा. असे नम्र आवाहन आयोजक श्री मित्र मंडळ नांद्रे यांनी केले आहे.