जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )मुंबईत काँग्रेस कडून ,11 एप्रिल 2023 ला मशाल मोर्चा काढण्याची तयारी चालू असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांच्या कडून मिळत असून, या मशाल मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे .
नुकत्याच काल झालेल्या बैठकीत याबाबतीतची रूपरेषा काँग्रेसकडून आखली गेली असून यास महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.11एप्रिल 2023 चा हा मशाल मोर्चा माहीम परिसरातून निघून चैत्यभूमी परिसरात पोहोचून समारोप होईल असे नियोजन केले आहे. काँग्रेस तर्फे आयोजन होत असलेल्या मशाल मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांच्या कडून देण्यात आली आहे.