जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )सांगली जिल्ह्यातील जत मध्ये, श्री. स्वामी समर्थ मंदिर मध्ये श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा 145 वा पुण्यतिथी सोहळा, मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे ,श्री स्वामी समर्थ मंदिर मध्ये काकड आरती, श्रींच्या मूर्तीस अभिषेक, महापूजा ,अलंकारिक पूजा, नैवेद्य या दैनंदिन कार्यक्रमाशिवाय ,मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 9:00 ते 12:00 ह. भ. प श्री. बाळकृष्ण महाराज शिंदे (सावळी) महाबळेश्वर यांचे कीर्तन होणार आहे. त्याच दिवशी दुपारी बरोबर 12:00 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा म्हणजेच फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे .यानंतर उपस्थित असलेल्या सर्व स्वामी समर्थ भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिर येथे वीरशैव भजनी मंडळ, माळी वस्ती, रामपूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम हा वेळेतच सुरू होणार असून सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत व श्री. स्वामी समर्थ मंदिर भक्त मंडळी तर्फे करण्यात आले आहे.
श्री.अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची 145 पुण्यतिथी महोत्सव हा गेली 18 वर्षे स्वामी समर्थ मंदिर जत येथे साजरा होत आहे.