जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)रिलायन्स उद्योग समूह लवकरच, 20 हजार कोटी रुपयांची बाजारपेठेत उलाढाल असणाऱ्या, आईस्क्रीम बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. रिलायन्स उद्योग समूह हा मुकेश अंबानींचा असून, प्राप्त झालेल्या माहितीनुसार रिलायन्स रिटेल वेंचरची एफ. एम. सी .जी. कंपनी, रिलायन्स कन्झुमर प्रॉडक्ट्स कंपनी, इंडिपेंडन्स च्या नावासह आईस्क्रीम उद्योगात प्रवेश करण्याची शक्यता, माहितगार सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर गुजरात मधील एका प्रख्यात कंपनीशी ही याबाबतीत चर्चा सुरू असल्याची माहिती असून, मुकेश अंबानींची मालकी असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाने जर आईस्क्रीम निर्मिती क्षेत्रात प्रवेश केल्यास, आईस्क्रीम बाजारपेठ क्षेत्रातील स्पर्धा निश्चितच वाढणार आहे.
आईस्क्रीम बाजारपेठेतील तज्ञांच्या माहितीनुसार, सध्याची आईस्क्रीमची बाजारपेठेतील उलाढाल ही जवळपास, 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, रिलायन्स उद्योग समूहाची, गुजरात मधील प्रख्यात असलेल्या आईस्क्रीम कंपनीशी चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सीझनमध्ये रिलायन्स उद्योग समूहाला, इंडिपेंडेंस या ब्रँड खाली आईस्क्रीम ची निर्मिती करून, आईस्क्रीम बाजारपेठेत आणण्याचा मानस आहे. दरम्यान मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समूहाने जर आईस्क्रीम निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करून आईस्क्रीम बाजारपेठेत प्रवेश केला, तर सध्याच्या अस्तित्वात असलेल्या आईस्क्रीम बाजारपेठेत फार मोठा बदल होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या आईस्क्रीम बाजारपेठ क्षेत्रातील स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात वाढेल अशी चिन्हे आहेत .रिलायन्स उद्योग समूहाच्या आईस्क्रीमची किंमत व उत्पादन कसे असणार ? याबाबत सध्याच्या आईस्क्रीम बाजारपेठेतील तज्ञांची चर्चा असून ,उत्सुकता वाढली आहे. शिवाय पुढील 5 वर्षात आईस्क्रीम बाजारपेठेच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, दिवसेंदिवस सध्या परिस्थितीतील वातावरणामुळे, ग्राहकांच्या आईस्क्रीम मागणीत वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स उद्योग समूहाने यापूर्वी डेअरी सेक्टर मधील तज्ञ आर. एस. सोधी यांना आपल्या समवेत घेतले आहे. डेअरी सेक्टर मधील तज्ञ आर .एस. सोधी यांनी यापूर्वी अमूल सोबत काम केले आहे.