जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,आज पासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होत असून, सायंकाळी 5:00 वाजता ,मुख्यमंत्री महोदय विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यातून विविध भागातून हजारो शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्याबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी हे अयोध्या दौऱ्यावर प्रथमच जात असून, शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे.
दरम्यान या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, मुख्यमंत्री महोदयांसह विविध खात्याचे मंत्री हे, राम लल्ला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकामाची पाहणी ,लक्ष्मण किल्ला मंदिरातील संतांचे आशीर्वाद घेऊन, शेवटी शरीर नदीच्या तिरावरती आरती करणार आहेत. अयोध्यानगरीत सध्या, विविध ठिकाणी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण असलेल्या चिन्हासह बॅनर लागले असून, ठाण्यातून आणि नाशिक मधून दोन रेल्वे देखील कार्यकर्त्यांसह अयोध्या नगरीकडे रवाना झाल्या आहेत. अयोध्येत सर्वसाधारण 3 हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहणार असून, त्यांच्या राहण्यासाठी धर्मशाळा व हॉटेलचे बुकिंग करण्यात आले आहे.