जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त सेवाभावी उपक्रम
- गाडी पंक्चर अथवा नादुरुस्त झाली काळजी नको आम्ही आहोत....! दुचाकी दुरुस्ती मोफत सेवा उपक्रम
कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
जोतिबा यात्रा 2023 यात्रेला जाताना गाडी पंक्चर अथवा नादुरुस्त झाली काळजी नको आम्ही आहोत...! दुचाकी पंचर काढणे अथवा दुरुस्ती या सेवाभावी उपक्रमाची कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनने जोपासली 22 वर्षांची परंपरा. निमित्त आहे जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेचे.
- उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक
यंदाच्या वर्षी मंगळवार 4 व बुधवार 5 एप्रिल 2023 या दिवशी जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा भरत आहे. लाखो भक्तगण लोक ज्योतिबाच्या नावानं चांगभलं जयघोषाच्या गजरात भक्तीभावाने डोंगरावर येत असतात. या यात्रेसाठी येणाऱ्या भक्ताची टू व्हीलर गाडी पंचर किंवा नादुरुस्त झाली तर कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन* मोफत सेवा पुरविण्यात येते. असोसिएशनने सातत्य राखत गेल्या 22 वर्षांपासून ही परंपरा
जोपासली आहे. यंदाच्या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत आम्ही असोसिएशनचे सर्व सन्माननीय मेकॅनिकल सभासद त्या भक्ताची गाडी घाटामध्ये, डोंगरावर नादुरुस्त किंवा पंचर झाली तर मोफत रिपेअर करून देतो. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- भाविकांसाठी उपक्रमाच्या माध्यमातून विनामूल्य सेवा-
चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रेच्या दरम्यान हजारो भक्त जोतिबा डोंगरावर येत असतात.
घाट रस्ता व कडक उन्हामध्ये भाविक आपल्या मुलाबाळांसह कुटुंबाला घेऊन आलेला असतो.
दरम्यान, घाटामध्ये गाडी नादुरुस्त किंवा पंचर झाल्यास त्या भक्तापुढे कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. भाविकाच्या कठीण प्रसंगात साथ व मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम विनामूल्य राबविण्यात येत आहे. तरी या उपक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
" एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ... "
यात्रेसाठी आलेल्या भाविकाची गाडी पंचर अथवा नादुरुस्त झाल्यास आता काय करायचे असा यक्षप्रश्न वाहन धारकासमोर उभा राहतो. त्यांना उद्भवणाऱ्या या अडचणीत एक मदतीचा हात देण्यासाठी हा सेवाभावी उपक्रम असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येतो. "एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह" या धर्तीवर असोसिएशनचे कार्यक्षम मेकॅनिकल पंचर अथवा दुचाकी वाहन नादुरुस्त असल्याची माहिती मिळाल्या क्षणी तत्काळ तेथे जाऊन भक्ताची गाडी मोफत रिपेअर करून देतो. या सेवाभावी कार्यामुळे भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो.तो चेहऱ्यावरील आनंद बघून आम्हालाही आत्मिक समाधान मिळते. या सेवाभावी उपक्रमामुळे आपण सर्व मेकॅनिक पुढील वर्षभर रिचार्ज होतो. तसेच अशा या ज्योतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेचा मोफत दुरुस्ती सेवा देऊन मेकॅनिकल स्वतःला धन्य मानतो.
- असोसिएशनचे क्रियाशील
मेकॅनिकलचे नाव व संपर्क नंबर असे...
नाना गवळी- 8623936359
धनंजय अस्वले- 9423041911
रवी कांडेकरी- 9422417626
बबन सावंत- 7058598322
माधव सावंत- 9421289066