जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत यांनी, सोनल पटेल सचिव, अखिल भारतीय कॉग्रेस कमेटी व महाराष्ट्र सहप्रभारी यांना, सांगली जिल्हा कॉग्रेस कमेटीचा जय भारत सत्याग्रह आंदोलन कार्याचा अहवाल सादर केला.
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्यावर चुकीचे आरोप लावून त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ, दि.२९ मार्च ते दि. ८ एप्रिल२०२३ दरम्यान सर्व ठिकाणी सभा घेणे.. भाषणासाठी सद्यस्थितीतील राष्ट्रीय मुद्दे तसेच महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्याचा समावेश करणे, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय व प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात सभा घेण्याचे नियोजन करणे , या सभासाठी वक्त्यांची नावे निश्चित करून जिल्हा नियंत्रण कक्षाकडे माहिती पाठविणे, दि. ३१ मार्च २३ रोजी पत्रकार परिषद आयोजित करणे,दि.१ एप्रिल रोजी ब्लॉक निहाय पत्रकार परिषद आयोजित करणे, दि. ३ एप्रिल रोजी युथ काँग्रेस, महिला काँग्रेस,एन एस यु आय, किसान काँग्रेस ,ओबीसी सेल, अल्पसंख्याक विभाग, एस.सी., एस टी विभाग डॉक्टर सेल व सर्व फ्रंटल, सेल, विभागाद्वारे मा. पंतप्रधानांना पोस्ट कार्ड पाठवून सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात पोस्ट कार्ड मोहीम राबविणे, या राबवलेल्या कार्यक्रमाची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडे देणे . दिनांक १५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान जिल्हा मुख्यालय येथे एकाच वेळी जय भारत सत्याग्रह सभा आणि जिल्हाधिकारी कार्यालय घेराव ही मोहिम राबविणे . दि.१५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान जय भारत सत्याग्रह सभा आयोजित करणे, या सभेस वरिष्ठ नेते उपस्थित राहुन संबोधित करणे. या कार्यक्रमांमध्ये जेष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, समविचारी पक्षाचे नेते, सामाजिक संघटना, आणि समाजातील सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करणे.
वरील सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा स्तरिय समिती व तालुका निहाय निरीक्षक नेमलेचा अहवाल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार विश्वजित ऊर्फ बाळासाहेब कदम,सुभाष तात्या खोत, नंदकुमार कुंभार,जत तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष बाबासाहेब कोडग,तुकाराम माळी, मोहनराव माने पाटील,रविंद्र आण्णा देशमुख, सचिन चव्हाण, आशिष कोरी,धनराज सातपुते,अजित भांबुरे,जितेंद्र पाटील,धनजय कुलकर्णी,आदीच्या उपस्थितीत सादर केला..