जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात गेले महिनाभर विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे, शेतकऱ्यांचे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील पिके नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, राज्य शासन पुढे सरसावले असून, राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी नुकताच राज्य शासनाने मंजूर केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा आज महाराष्ट्र राज्य शासन निर्णय जारी झाला आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या मते सुमारे राज्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, राज्यातील 1 लाख 13 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्र, अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, राज्य आपत्ती निवारण निधीतून ,सदरूहु 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच तो जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्यात येईल .ही मदत देताना केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीसाठी घातलेल्या अटींची व शर्तींची पूर्तता करून, संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावी असे शासन आदेशात म्हटले आहे.