जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच काही पक्षांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला असून, तर काही पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे. यामध्ये मुख्य म्हणजे राष्ट्रवादी पक्षाने, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी लोकसभेतील निवडणुकीच्या एकूण जागांच्या तुलनेने 2 टक्के जागा किमान तीन राज्यांमधून जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत किमान 4 राज्यांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली पाहिजेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जा बहाल केलेल्या पक्षांमध्ये आम आदमी पक्षाला ,राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला गेला आहे. आता देशात फक्त भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ,आम आदमी पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी असे एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतल्यानंतर, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चिंतन करावे लागणार आहे व भविष्यकाळात पक्षाचा गमावलेला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.