जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील येथे दत्त सहकारी साखर कारखान्याच्या लाॅन वर, स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे .पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त, स्व. डॉ. अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन व महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र कोल्हापूर याच्या संयुक्त विद्यमान्वये, सोमवार दि. 3 एप्रिल 2023 दुपारी 2:00 वाजता, दत्त सहकारी साखर कारखान्याच्या लॉनवर उद्योजकता परिचय मेळावा आयोजित केला आहे. श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. डॉ. अप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त, हा उद्योजकता परिचय मेळावा एक दिवसासाठी होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील युवक ,युवती, महिला नवोद्योजक या सर्व सुशिक्षितांना,उद्योगांविषयी माहिती होऊन, जास्तीत जास्त नवउद्योजक युवक- युवतींचा -महिलांचा उद्योग व्यवसायाकडे जाण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी हा उद्योजकता परिचय मेळावा आयोजित केला आहे. सदरच्या उद्योजक परिचय मेळाव्यामध्ये, शासकीय योजना विषयी, कर्जांविषयी, अनुदानाविषयी माहिती तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज संदर्भात माहिती उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मिळणार आहे. दि. 3 एप्रिल रोजी दुपारी 2:00 वाजता होणाऱ्या उद्योजक परिचय मेळाव्याचा लाभ, सर्व युवक- युवती- नवउद्योजक -महिला उद्योजक यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.