जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यातील नायब तहसीलदार, तहसीलदार आज 3 एप्रिल 2023 पासून काम बंद आंदोलन चालू केले असून, नायब तहसीलदार यांना राजपात्रित वर्ग 2 चे 4800 रुपयांचे ग्रेड पे लागू करावे या मागणीसाठी आंदोलन उभारले आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे आज तीन एप्रिल 2023 पासून सुरू होत असलेल्या काम बंद आंदोलनामुळे, राज्यातील महसूल सेवा बंद पडून, सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार आहे. के. पी. बक्षी. यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समितीने नायब तहसीलदार यांना, राजपात्रित वर्ग दोन चे 4800 रुपयांचे ग्रेड पे वाढवण्याबाबत, अहवाल सादर करून शिफारसही केली होती. ह्या मागणीचा अद्याप विचार झाल्या नसल्याने ,हे आंदोलन करणे अनिवार्य झाले असल्याचे संघटनेने म्हटले आहे .यापूर्वी महसूल मंत्री, वित्त मंत्री, अपर सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शासनाने अद्यापही आश्वासन पाळले नसल्यामुळे, महसूल विभागातील नायब तहसीलदार, तहसीलदार यांना संपावर जाणे भाग पडले आहे असे संघटनेचे मत आहे.