जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने ,आज राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे एक तास राष्ट्रवादी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज , राष्ट्रवादी युवकचे शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .
सदर बैठक की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर मा. दिग्विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व सांगली शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष मा सागर घोडके यांच्या पुढाकाराने घेण्यात आली बैठकीत प्रत्येक प्रभागांतील नागरिकांच्या समस्या व प्रश्न पदाधिकारी यांनी मांडले , त्याची नोंद घेऊन सदर समस्यांचा आढावा घेण्यात आला , तसेच पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी चे उत्तम कांबळे ,समीर कुपवाडे , धनपाल खोत ,अनिता पांगम ,संगीता जाधव ,सुरेखा सातपुते , महालिंग हेगडे ,उमर गवंडी ,डॉ पृथ्वीराज पाटील ,अर्जुन कांबळे ,सुरेश बंडगर ,संदीप दळवी , छाया पांढरे ,उषा गायकवाड ,स्वाती शिरूर प्रकाश सुर्यवंशी ,रामभाऊ पाटील ,सोमनाथ सुर्यवंशी ,नितीन माने, रुपेंद्र जावळे , समाधान मोहिते ,अमित पाटील ,फिरोज मुल्ला ,अभिजित रांजणे,सुभाष तोडकर ,महावीर खोत ,प्रीती गोंधळे , विजय नादेकर ,आदर्श कांबळे ,प्रवीण आरते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.