जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, प्रशांत दामले रंगकर्मी पॅनल विजयी झाले असून, रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालू राहून, पहाटेच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला. मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांपैकी 8 जागांवर ,प्रशांत दामले पॅनलचे उमेदवार म्हणजेच रंगकर्मी पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत, उर्वरित 2 जागेवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार स्वतः प्रसाद कांबळी यांचे सह सुकन्या कुलकर्णी- मोने विजय झाले आहेत. मुंबईमधील 4 जागांपैकी 2 जागा प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी पॅनलला तर 2 जागा प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलला मिळाल्या आहेत.
प्रशांत दामले यांच्या रंगकर्मीमध्ये अनेक दिग्गज कलाकार असून, यातील विजय केंकरे, अजित भुरे ,सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश होता. प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनेल मध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम ,राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे आदींचा समावेश होता.