जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 16 आमदारांच्या अपात्रतेचा व इतर प्रकरणांच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा निकाल, लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या रंगतदार स्थितीमध्ये आले आहे. काही वेळा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा विविध मुद्द्यांवर बोलताना विसंगतीची विधाने आढळून आली होती. आज राज्याच्या राजकारणात 15 दिवसात 2 मोठे भूकंप होणार असल्याचे प्रतिपादन, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
आज काही प्रसारमाध्यमावरून, येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात राजकारणात उलथापालत होईल ! फक्त 15 दिवस वाट बघू !या राज्याच्या राजकारणात 2 मोठे बॉम्बस्फोट होतील! असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे सध्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकारणात नेमके कुठे काय होईल? कुठे कसे पाणी मुरत आहे? याची कल्पना अजून कोणालाच नसल्याने, येणाऱ्या 15 दिवसासाठी वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.