जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून, नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. दरम्यान जून पासून सुरु होणाऱ्या राज्यातील शैक्षणिक धोरणात, नवीन शैक्षणिक धोरणाचा अंमल चालू होईल. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पुण्यात बोलताना ही माहिती दिली. राज्यातील सर्व इंजिनिअरिंग मधील शिक्षण सुद्धा, यापुढे मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, तसेच ही एक दिलासा देणारी बातमी ठरणार आहे .यापुढे जाऊन राज्याच्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की तांत्रिक शिक्षणाबरोबरच, वैद्यकीय शिक्षण सुद्धा संपूर्णपणे मराठी मध्ये दिले जाण्याचा मानस आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून, हा एक क्रांतिकारक बदल घडून घेत आहे असे म्हणावे लागेल.