जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्रात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य, योगदान याविषयी माहिती, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नुकतीच गौरव यात्रा सर्वत्र काढण्यात आली होती. त्यांच्या कार्याविषयी माहिती, जनतेमध्ये जागृत व्हावी म्हणून, 28 मे हा दिवस महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नुकतीच ट्विट करून केली आहे. दरम्यान यापुढे राज्य शासनातर्फे 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस, स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात 28 मे रोजी सार्वत्रिकपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारांवर व माहितींवर आधारित, विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे मोलाचे योगदान दिले आहे, तसेच त्यांच्या देशभक्तीचे , प्रगतिशील विचारांचे , सर्वच माध्यमातून अभिवादन करण्यासाठी, स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी, महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली होती. महाराष्ट्रात यापुढे 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येण्याच्या निर्णयामुळे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी, प्रसारासाठी फार मोठे मौलाचे सहाय्य होणार आहे.