जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षी पहिलीला प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांच्यात, प्रवेश प्रक्रिये पूर्वी , कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष मोहिमेची योजना आखली आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास 65 हजार शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेपूर्वी, सदरहू मुलांच्या मध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी, मोहीम राबवण्यात येणार आहे .महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षी 2023 - 24 सालासाठी, फार मोठ्या प्रमाणावर विशेष मोहीम अभियान राबवले जाणार असून ,विशेष म्हणजे यात पहिलीच्या मुलांच्यासह पालकांसाठीही मेळावा आयोजित करण्यात येणार आहे .प्रत्येक शाळेच्या बालवाडी मधून पहिलीला प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांच्यासाठी, किमान कौशल्य विकसित होण्यासाठी, सदरहू शिक्षण विभागाच्या अभियानाचा फायदा होणार आहे. त्यामुळे पहिलीला प्रवेश घेणाऱ्या बालकांच्यात आवश्यक असणारी कौशल्य विकसित होणार असून, बालकांच्यात फार मोठा विकास घडून येणार आहे.
पहिलीला प्रवेश घेणाऱ्या मुलांमध्ये शारीरिक, बौद्धिक कौशल्य, रंग, ज्ञान, भाषा, ज्ञान ,अंक ,भावनिक ज्ञान, गणित आदि जवळपास 12 कौशल्य विकसित करण्यासाठी, या शिक्षण विभागाच्या मोहिमेचा फायदा बालकांना होणार आहे .पहिलीला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलांच्यामध्ये, कौशल्य विकसित ज्ञानामध्ये भर पडणार असून, या मोहिमेसाठी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून कंबर कसून मोहीम हाती घेतली जाणार आहे .राज्यातील जवळपास 65 हजार शाळांमध्ये ,सदरची मोहीम दोन टप्प्यात राबवली जाणार असून, त्यातील पहिला टप्पा हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात व दुसरा टप्पा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वी घेण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये ,जवळपास 2 लाख 50 हजार बालकांची सदरहू मोहिमेमुळे वाढ होईल असे शिक्षण विभागाचे मत आहे .गेल्या वर्षीही असाच उपक्रम राबवून जवळपास 2.5 लाख बालकांची, इयत्ता पहिली प्रवेशासाठी वाढ झाली होती. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही जवळपास 2 लाख50 हजार बालकांची संख्या, सरकारी शाळेमध्ये वाढेल असा अंदाज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे यांनी व्यक्त केली आहे.